25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारणराजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

Google News Follow

Related

विरोधी पक्षांनी आज, १७ जुलैला माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मंगळवार, १९ जुलैला अल्वा यांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा करताना शरद पवार म्हणाले की, मार्गारेट अल्वा यांच्या नावावर १७ विरोधी पक्षांनी एकमताने निर्णय घेतला आहे. अल्वा यांचा सामना आता एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर यांच्याशी होणार आहे.

एनडीएकडून जयदीप धनवड यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तसेच राष्ट्रपतीपदासाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.

हे ही वाचा:

अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!

शिंदे- फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड, टुटेगा नही!

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींचा फोटो कचऱ्यात, कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

पुलवामात भ्याड दहशदवादी हल्ला, एक जवान शहीद

दरम्यान,एप्रिल १९७४ मध्ये अल्वा काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर त्या पुन्हा सलग तीन वेळा राज्यसभेवर निवडून आल्या. अल्वा १९९९ मध्ये उत्तरा कन्नड मतदारसंघातून खासदार झाल्या होत्या. २००९ मध्ये अल्वा उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. यानंतर त्या राजस्थान, गुजरात आणि गोव्याच्या राज्यपाल होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा