ट्विटरवर गाजला मराठी राबडी देवी हॅशटॅग

ट्विटरवर गाजला मराठी राबडी देवी हॅशटॅग

ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट जगभरातील लोकप्रिय समाज माध्यमांपैकी एक आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक घटनांवर लोक ट्विटरवर व्यक्त होत असतात आणि त्याला साजेसे असे हॅशटॅग वापरत असतात. गुरुवार, ६ जानेवारी रोजी अशाच प्रकारे मराठी राबडीदेवी हा हॅशटॅग ट्विटरवर गाजला. गुरुवारी रात्री उशिरा हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. देशभरात क्रमांक दोनचा ट्रेडिंग होणारा हॅशटॅग ठरला.

जवळपास आठ हजार पेक्षा जास्त ट्विट्स भारत भरातून या हॅशटॅगच्या अंतर्गत करण्यात आली होती. अतिशय उत्स्फूर्तपणे ट्विटरवर हा हॅशटॅग सुरु झाला आणि प्रसिद्धही झाला. याला कारण ठरले भाजपाचे महाराष्ट्र सोशल मिडिया सेलचे प्रभारी जितेन गजारिया यांची महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या मार्फत करण्यात आलेली चौकशी!

जितेन गजारिया यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोटो टाकत मराठी राबडी देवी असे लिहीत ट्विट केले. हे ट्विट महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आणि सत्ताधारी शिवसेनेला झोंबले. त्यांना हे ट्विट आक्षेपार्ह वाटले आणि त्यासाठी गजारिया यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. या संपूर्ण घटनेची समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. तर मराठी राबडी देवी हे म्हणण्यात आक्षेपार्ह नेमके काय आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. या सर्वात मराठी राबडी देवी हा हॅशटॅग वापरला जात होता . त्यामुळे तो चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला.

दरम्यान जितेन गजारिया यांच्या विरोधात मुंबई नंतर पुण्यातही तक्रार करण्यात आला असून गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. रात्री उशिरा पुणे पोलीस गजारिया यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. पण ते बाहेर गावी गेले असल्याचे समजते.

Exit mobile version