मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर

मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर

कुरार येथील मेट्रो स्थानकासाठी मराठी माणसाच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. या प्रसंगी आपली मुसळधार पावसात आपले घर वाचवण्यासाठी आक्रोश करणार्‍या आणि या कारवाईच्या आड येणाऱ्या नागरिकांना नागडे करून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कुरार येथील मेट्रो बांधकामासाठी स्थानिक मराठी माणसाला बेघर करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला आहे. शनिवार, १७ जुलै रोजी सकाळी एमएमआरडीए मार्फत या कारवाईला सुरुवात झाली. त्यासाठी अगोदरच या संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करून जमाव बंदी लावण्यात आली होती. ज्या नागरिकांनी या कारवाईला विरोध करायचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून नागडे करून मारहाण केल्याची अतिशय संतापजनक घटना देखील घडली. जेव्हा मराठी माणसाच्या घरांवर बुलडोझर फिरवला जात होता तेव्हा माध्यमांना किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांना तिथे जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी पीडित मराठी माणसांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी अटक केली. ही अटकेची कारवाई करताना भातखळकर यांना अतिशय आक्रमकपणे ताब्यात घेण्यात आले. यामध्ये भातखळकर यांचा चष्माही फुटला.

हे ही वाचा:

मराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”

कोरोनाच्या या काळात अशा प्रकारची कोणतीही कारवाई करून सामान्य माणसाला बेघर करू नये असे न्यायालयाचे निर्देश आहेत. पण ते धाब्यावर बसवून एमएमआरडीए तर्फे हा बुलडोझर फिरवला गेला. त्यामुळे या विषयात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे. सोमवारी न्यायालयात या प्रकरणात कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट अर्थात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येणार आहे. तर कुरार येथील नागरिकांचे गिरगाव पॅटर्ननुसार त्याचठिकाणी पुनर्वसन केले जावे ही मागणी भाजपातर्फे लावून धरण्यात येणार आहे.

काय आहे गिरगाव पॅटर्न?

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मेट्रो प्रकल्पामध्ये ज्यांची घरे जात होती अशा नागरिकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले गेले. त्यावेळी कमीत कमी ३५० चौरस फुटांची घरे या नागरिकांना देण्यात आली होती. पण कुरार येथे मात्र तसे होताना दिसत नाहीये. ठाकरे सरकारकडून कुरार येथील मराठी माणसाला गोरेगाव पश्चिम येथे निकृष्ट दर्जाची घरे देण्यात आली आहेत.

Exit mobile version