बिश्नोई गँगच्या धमकीमुळे बॉलिवूड सेलिब्रिटी निवडणूक प्रचारापासून दूर; मराठी सेलिब्रिटींना मागणी

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सामील झाले रॅलींमध्ये

बिश्नोई गँगच्या धमकीमुळे बॉलिवूड सेलिब्रिटी निवडणूक प्रचारापासून दूर; मराठी सेलिब्रिटींना मागणी

विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या, मात्र यंदाच्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचार यात्रेत तसेच सभेत एकही बॉलीवूड सेलिब्रिटी दिसून आले नसल्यामुळे लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजिकीय पक्षांकडून हिंदी मराठी सेलिब्रिटीना निवडणुकीच्या प्रचारात उतरवले जाते, मात्र यंदा बॉलिवूड मधील सेलिब्रिटीनी बिष्णोई टोळीच्या धाकामुळे निवडणूक प्रचारापासून दूर राहणे पसंत केले आहे. यंदा मात्र बॉलिवूड सेलिब्रिटीची जागा मराठी सेलिब्रिटीनी घेतली होती.

बिश्नोई टोळीकडून महिन्याभरापूर्वी बाबा सिद्दीकीची हत्या आणि सलमान खान आणि शाहरुख खान यांना आलेल्या धमक्यामुळे बॉलिवूड मध्ये खळबळ उडवून दिली होती, लॉरेन्स बिष्णोईकडून आलेल्या धमक्यांमुळे बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबई आणि राज्यभरातील निवडणूक प्रचारापासून दूर गेले आहेत. राजकीय पक्षाकडून निवडणूक प्रचार रॅलीसाठी मराठी आणि दक्षिण भारतीय ससेलिब्रिटीची मागणी वाढली आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष मराठी आणि दक्षिण भारतीय रॅली आणि सभांना आमंत्रित करत आहेत.

हे ही वाचा:

प्रचाराची रणधुमाळी थांबली, आता मतदानाकडे लक्ष

अनिल देशमुखांवर हल्ला, रुग्णालयात दाखल

उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले

खर्गेंच्या जिल्ह्यात सोयाबीनला भाव ३,८०० रु आणि काँग्रेस म्हणते, महाराष्ट्राला सात हजार देवू!

बिश्नोई गँगच्या धमक्यांचा प्रभाव :

यापूर्वी, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारखे बॉलीवूड सेलिब्रिटी वारंवार माजी मंत्री बाबा सिद्धिक यांसारख्या नेत्यांच्या रॅलीत जात असत, ज्यांच्या सेलिब्रिटी कनेक्शनमुळे त्यांना राजकीय फायदा झाला. मात्र, बिश्नोई टोळीने सिद्धिकीची हत्या आणि त्यानंतर सलमान आणि शाहरुखला आलेल्या धमक्या यामुळे संपूर्ण निवडणुक प्रचाराचे चित्र बदलले आहे. यंदा बॉलीवूड स्टार्स प्रचारात सहभागी होण्याचे टाळत आहेत. दरम्यान, रितेश देशमुख सारखे अभिनेते लातूरमध्ये सक्रिय आहेत, रितेश देशमुख हे स्वतःच्या भावाचा प्रचार करीत आहे.

विशिष्ट जिल्ह्यात दक्षिण भारतीय सेलिब्रिटी :

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर आणि नांदेडसारख्या जिल्ह्यांमध्ये, तेलुगू भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप तेलगू अभिनेता पवन कल्याणचा वापर करण्यात आहे. पवन कल्याण हे सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी बल्लारपूरसारख्या प्रदेशात हजेरी लावली आहे.

प्रचारासाठी सेलिब्रिटीचे दर

निवडणुकीत सेलिब्रिटींच्या वाढत्या मागणीमुळे त्यांचे दर वाढले आहे. मराठी सेलिब्रिटी प्रत्येक प्रचार कार्यक्रमासाठी ५हजार ते ५ लाखांपर्यंत शुल्क आकारतात, तर बॉलीवूड सेलिब्रिटी त्यापेक्षा मोठ्या रकमेची मागणी करतात. चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हस्या जत्रा यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमधील कलाकारांची विशेष मागणी यंदा वाढली आहे. इव्हेंट स्केल आणि स्थानानुसार, काही सेलिब्रिटी प्रतिदिन ५ ते १० लाख आकारतात, तर उच्च-स्तरीय बॉलीवूड सेलिब्रिटी २० ते ३५लाख आकारतात.

Exit mobile version