सुमित राघवन म्हणतो, योगींसारख्या व्यक्ती महाराष्ट्रातसुद्धा हव्यात

सुमित राघवन म्हणतो, योगींसारख्या व्यक्ती महाराष्ट्रातसुद्धा हव्यात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच त्यांच्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील लाऊडस्पीकरपासून ते स्पीड ब्रेकरपर्यंतच्या अनेक मोठ्या मुद्द्यांवर नवीन आदेश जारी केले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असताना मराठी अभिनेता सुमित राघवन यानेही योगींचे कौतुक केले आहे.

योगी आदित्यनाथ यांचा सूचना देतानाचा व्हिडीओ शेअर करत सुमित राघवन याने ट्विट केले आहे की, “मी पहिल्यांदा असे कोणा एका राज्याच्या प्रमुखाला रस्ते, स्पीड ब्रेकर्स आणि माफिया यांच्याविषयी बोलताना पाहिले आहे आणि ऐकले आहे. आपल्यालाही अशा व्यक्तींची गरज असते. त्यांच्या आवाजावरून आणि डोळ्यातून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. सलाम योगीजी,” असे ट्विट सुमित राघवन याने केले आहे.

रस्ते, महामार्ग, चौक अशा ठिकाणी कुठेही कोणत्याही वाहनांचे अनधिकृत थांबे असता कामा नये. पुढच्या २४ तासांमध्ये हे अनधिकृत थांबे हटवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. माफियांना कोणत्याही व्यवहारात आणि कामात येऊ देऊ नका. एक जरी माफिया आला तर तो त्या कामाला त्याचा अनधिकृत कामांचा अड्डा बनवून टाकेल. त्यामुळे त्यांना कामे देऊच नका, असे आदेश योगी यांनी दिले आहेत.

रस्त्यावर बनवण्यात येणारे स्पीडब्रेकर हे कमरतोड बनवू नयेत. या अशा स्पीड ब्रेकरमुळे आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांना त्रास होतो. जिथे स्पीड ब्रेकरची गरज नाही अशा ठिकाणांचे स्पीड ब्रेकर काढून टाकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

रस्त्याच्या कडेला कोणतेही वाहन उभे नसेल याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. अनेकदा कितीतरी किलोमीटर लांब ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात. या वाहनांसाठी पार्किंग जागा उपलब्ध करून द्या. या ट्रक्समुळे अनेकदा अपघात होत असतात असेही योगी म्हणाले. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धाब्याकडे उत्तम पार्किंग व्यवस्था नसल्यास असे धाबेही हटवण्याच्या सूचना योगी यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version