एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक

एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

अँटीबॉडी कॉकटेल म्हणजे नेमकं काय?

कोरोना रुग्णसंख्येत ७५ दिवसांचा निचांक

शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे कंत्राटदाराचा जीव धोक्यात?

पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन

रायगडचे आगरी खूप डेंजर आहेत, ते आपल्या घरात कोयते ठेवतात. त्यामुळे एअरपोर्टला नाव द्यायला आल्यास ते परत जाणार नाहीत, असं वक्तव्य सोशल मीडियावर केल्याने पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी एकेरी शब्द वापरत गायकवाडांनी बदनामीकारक वृत्त खाजगी युट्यूब चॅनलवरुन प्रसारित केल्याचा आरोप आहे,

Exit mobile version