मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे झटत आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सरकारने लवकरात लवकर तडीस न्यावा अन्यथा २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितलं होत.यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही होणार नाही, आम्हाला थोडा वेळ द्या. आमचं सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. आम्ही मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहोत. त्यांनी फक्त थोडा वेळ द्यावा, असं गिरीश महाजन म्हणाले.आरक्षण देईल तर हेच सरकार देईल फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल, असं गिरीश महाजन म्हणाले.नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे.राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला द्या अन्यथा पुन्हा उपोषण करू असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला होता.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.पण थोड्या कालावधीची गरज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील म्हणाले होते.मात्र,मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उद्या २५ ऑक्टोबर पासून उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
यावर मंत्री महाजन म्हणाले,मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीचे वेगाने काम सुरु केलं आहे. मला वाटतं, त्यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल. अजूनही थोडा वेळ लागेल, असं मला वाटतंय.चर्चा ही सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल. पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयुक्तता होणार नाही, असंही गिरीश महाजन म्हणालेत.
हे ही वाचा:
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
तालिबानला खुपतोय अफगाणिस्तानचा विजय
सरसकट आरक्षणाची काही आवश्यकता नाही. पण मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समिती अभ्यास करत आहे. अजून किती दिवस लागेल, हे मला सांगता येणार नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्याचमुळे आमच्या सरकारच्या काळात मोर्चे निघत आहेत. सरकार त्याची दखल घेत आहे. पण याबाबतीत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असं गिरीश महाजन म्हणाले.मराठा आरक्षण मिळत नाही. तोवर नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यावर यातून लवकरच मार्ग निघेल. फार काही बंदी वगैरे याची गरज पडणार नाही, असंही महाजन म्हणालेत.
निलेश राणे राजकारणातून बाहेर पडल्याचं आश्चर्य
माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या या निर्णयाची घोषणा केली. राजकरणात मन रमत नसल्याचे कारण देत त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.त्यावर गिरीश महाजन याना विचारले असता ते म्हणाले, मला सुद्धा प्रसार माध्यमातूनच हे कळालं.मलाही आश्चर्य वाटलं की, त्यांनी असा निर्णय कसा घेतला?, असं गिरीश महाजन म्हणाले.