३ मार्चपर्यंत मराठा आंदोलन स्थगित

मनोज जरांगेंची घोषणा

३ मार्चपर्यंत मराठा आंदोलन स्थगित

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा गाजल्यानंतर आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी ३ मार्चपर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना उद्देशून अपशब्द वापरल्याबद्दल माफी मागत त्यांचे शब्द मागे घेतले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी ३ मार्च २०२४ पर्यंत मराठा आरक्षण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. राज्य सरकार सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करत नाही, उलट बदनाम करण्यासाठी कटकारस्थान केलं जात आहे असं म्हणत जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांच्यावर खालच्या भाषेत टिपण्णी केली होती. त्यानंतर अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले. शिवाय अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरु आहे. काही भागात संचारबंदीदेखील लागू केली. या प्रकारानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगितीची घोषणा केली.

हे ही वाचा:

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

अकबर महान कसला?, तो तर बलात्कारी!

सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांचा द्वेष करताना दिसून येत आहे. राज्य सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण आम्हाला नको. आता जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही. तुरुंगात तडफडून मृत्यू झाला तरी उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं. मागील महिन्याभरापासून सरकारने कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप थांबवलेलं आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शांततेत रास्ता रोको करत होतो परंतु आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे.”

Exit mobile version