जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!

भाजपा नेते नितेश राणे यांनी दिले प्रत्युत्तर

जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!

मराठा आरक्षणासाठी आंदोलने करणारे मनोज जरांगे यांनी आता मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली आहे. ते कसं दिल जात नाही तेच पाहतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यावर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

जरांगे यांनी मागणी केली आहे की, सरकारी नोंदी या मुस्लिमांच्याही निघाल्या. जर त्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात, लिंगायत, मारवाडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघआल्यात, लोहार समाजाच्या निघाल्या जर सरकारी निघाल्या नोंदी तर मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. जे कायद्याने बोलायचे ते कायद्याने बोला. त्यांच्यात पाशा पटेलांची कुणबी म्हणून नोंद निघाली. जर मुस्लिमांची सरकारी नोंद कुणबी म्हणून निघाली असेल तर राज्यातील सगळ्या मुस्लिमांना तुम्ही कुणबी म्हणून नोंद केली पाहिजे. ओबीसीत आरक्षण दिलंच पाहिजे, नाही दिलत तर मी पाहतोच.

यासंदर्भात भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुस्लिम धर्माच्या नावाने आपल्या संविधानात कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही. उलट मुस्लिम धर्मातील विविध जाती ही गरीब जात आहे. त्या जातीसाठी आरक्षण मागा. धर्माच्या नावावर कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!

मध्यप्रदेशात भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!

मागासवर्गीय तरुणानेच लिहिले नाशिकमधील ते पत्रक !

ज्ञानवापीचे सर्वेक्षण करू देणाऱ्या न्यायाधीशांच्या हत्येसाठी इस्लामी कट्टरवाद्यांचा कट

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका करताना म्हटले की, जी गोष्ट आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? कुणीतरी माणूस उठतो आणि व्यवस्था वेठीस धरतो.

हिंदू समाज सामाजिक उतरंडीमध्ये उतरला आहे. मुस्लिम समाजात जाती नाहीत. धर्म आहे. ज्यांच्या नोंदीच केल्या नाहीत त्यांना ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षण ही काही खिरापत नाही. ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. कुणबी प्रवर्ग हा वेगळा प्रवर्ग आहे. त्यांचे सोयरेपण, राहणीमान वेगळे आहे. पण कुणबी हे नाव घेऊन सगळे चालले आहे. जरांगे काहीही बोलत आहेत. मराठा तरुणांना माझी विनंती आहे की, प्रगती करायची असेल तर आरक्षण हा एकमेव पर्याय नाही. १० टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्वेक्षण १०० टक्के बोगस आहे.

 

Exit mobile version