माओवादी आणि कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी फादर स्टॅन स्वामीचं मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झालं. विशेष म्हणजे आजच स्टॅनच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती.
फादर स्टॅन स्वामी पार्किनसन्ससह अनेक व्याधींनी ग्रस्त होता. त्यांनी गेल्या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती. प्रकृती बरी नसल्याने त्याला होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. स्टॅनच्या वकिलांनी त्यांची तब्येत सातत्याने खालावत असल्याची माहिती कोर्टाला दिली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.
पुण्यात २०१८ मध्ये एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव परिसरात हिंसा उसळली होती. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली होती. नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात स्टॅनचाही समावेश होता.
हे ही वाचा:
ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार
वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप
या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही
ठाकरे सरकार अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार?
फादर स्टॅन आणि त्याचे सहकारी बंदी असलेल्या माकपा (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याचा त्यांच्यावर एनआयएने आरोप केला होता. तसेच एक प्रतिज्ञापत्रं सादर करून एनआयएने स्टॅन यांच्या जामिनाला विरोध केला होता. स्टॅन यांच्या आजाराचा काहीही ठोस पुरावा नाही. स्टॅन हे माओवादी असून देशात अशांतता निर्माण करण्यासाठी तो षडयंत्र रचत होता, असा दावा एनआयएने केला होता.