देशात नुकतेच तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले.दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या पुढील काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणाले आहेत.शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटत असेल”, असं शरद पवार म्हणाले. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील, असे शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा:
ऍस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून करोना लस मागे घेणार!
मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!
हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!
नीरव मोदी याला ब्रिटनच्या न्यायालयाचा धक्का!
‘शिवसेना उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे’ आहेत.त्यांची विचारसरणी आमच्यासारखीचा ते समविचारी आहेत, असे शरद पवार म्हणाले.दरम्यान, बारामतीत आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘अजित पवारांना राजकीयकृष्ट्या परत यायचं असेल तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही’, असेही ते म्हणाले आहेत.दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.