महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत यांनी गायलेल्या रावण महात्म्याची चांगलीच चर्चा आहे. संजय राऊत यांच्या उफाळून आलेल्या रावण प्रेमावरून त्यांच्या विरोधात चांगली टीकेची झोड उठली भारतीय जनता पार्टीने राऊत यांना लक्ष केले असून त्यांच्या विधानावर तोफ डागली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी तर “उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात रावणाला ही लाज वाटेल असे मंत्री आहेत” असे म्हणत शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डोंबिवली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर व्यक्त होताना. रावणाने सीतेवर कधी अत्याचार केला नाही अशी मुक्ताफळे उधळली. “महिलांवर अत्याचार व्हावा असे कोणत्याच सरकारला वाटत नसते. रावणालाही वाटत नसेल. म्हणूनच रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले तेव्हा तिच्यावर अत्याचार केले नाहीत. तिला सन्मानपूर्वक अशोक वनात ठेवले” असे राऊत म्हणाले.
त्यांच्या याच विधानावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून राऊतांना लक्ष्य केले आहे. “रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसले आहेत…यांना रावणाबाबत ममत्व असणे स्वाभाविकच नाही का? असे भातखळकरांनी म्हटले आहे.”
रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसले आहेत…
यांना रावणाबाबत ममत्व असणे स्वाभाविकच नाही का? pic.twitter.com/yyBaDaG4Ry— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
हे ही वाचा:
भारतीय हवाई दलात लवकरच येणार एअरबस
‘केंद्र सरकारने जे केले ते कोणताही देश करू शकत नाही’
दिल्लीत ‘या’ कोर्टात का झाला गोळीबार?
भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित
तर भाजपा महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवरूनही राऊतांवर निशाणा साधला गेला आहे. “अयोध्येतील राम मंदिराचे फुकट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे रावण प्रेम उघड झाले आहे. पण मुळात सिता मैय्याला पळवून नेणे हाच मोठा अत्याचार नव्हता का? याचे उत्तर कार्यकारी संपादक महोदयांनी दिले तर बरं होईल.” असे भाजपाने म्हटले आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे फुकट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे रावण प्रेम उघड झाले आहे.
पण मुळात सिता मैय्याला पळवून नेणे हाच मोठा अत्याचार नव्हता का? याचे उत्तर कार्यकारी संपादक महोदयांनी दिले तर बरं होईल pic.twitter.com/yI8XBr93YG— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 24, 2021