भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुदृढ नेतृत्व, लोककल्याणकारी नेता, दूरदर्शी अशा असंख्य विशेषणांसह नरेंद्र मोदी यांचे अभिष्टचिंतन नेत्यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिडला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदिंनी एक्सवरून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्या दूरगामी दृष्टीने आणि सुदृढ नेतृत्वाच्या जोरावर आपण भारताच्या या अमृतकाळात देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त कराल अशी खात्री आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे की, आपल्या दूरदर्शी नेतृत्वामुळे, भारताला प्रगती आणि परिवर्तनाच्या एका वेगळ्या शिखरावर विराजमान केले आहे. आपला वारसा हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
ओम बिडला यांनी म्हटले आहे की, देशाची प्रगती, विश्वकल्याणाच्या भावनेतून आपण जे कार्य करत आहात त्यामुळे भारताला वैश्विक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले आहे की, आपल्या नेतृत्वाखाली देशात भय, भूक, भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात येवो आणि भारताला पुन्हा एकदा विश्वगुरूचे स्थान प्राप्त होवो अशी प्रार्थना.
दरम्यान, भाजपाने या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे जंगी आयोजन केले आहे. त्यात नवो विकास उत्सव, सेवा पखवाडा कार्यक्रमांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, देशाच्या विकासाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाशी आपले नाते निर्माण केले आहे. देशातील कोट्यवधी गरिबांच्या आयुष्यात बदल केल्यामुळे त्यांची दीनमित्र अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, माँ भारतीच्या सुपुत्राला शुभेच्छा. नवा भारत, विकसित भारताचे शिल्पकार म्हणून नरेंद्र मोदींची ओळख बनली आहे. देशाला विकसित भारत बनविण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात, जी दूरदृष्टी बाळगली आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींनी संन्याशी होण्यासाठी सोडले होते घर…सर्वसामान्य घरातून पंतप्रधानपदाचा प्रवास
देशात २३ नव्या सैनिकी शाळा उभारणीला मान्यता
भाजपाची बी-टीम नेमकी कोणती? मोदी कोणाला वाचवतायत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भारी ! बायडेन सातव्या क्रमांकावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, नव्या भारताचे प्रखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भविष्याचा वेध घेणारे, जागतिक दर्जाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. हॅप्पी बर्थडे बॉस. राहुल गांधी यांनीही नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्ट लाभो अशी प्रार्थना.
परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रेरणादायी नेतृत्व यामुळे भारत जागतिक स्तरावर एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.