25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारण“दिल्लीचे सरकार खोटे आणि लुट करणारे सरकार”

“दिल्लीचे सरकार खोटे आणि लुट करणारे सरकार”

भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांचा आपवर प्रहार

Google News Follow

Related

दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना तेथील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा आणि सत्ताधारी आप दोघेही आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपाने आपला अनेक मुद्द्यांवरून घेरलं असून निवडणुकीपूर्वी आपच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी आप सरकारवर टीका केली आहे.

भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी दिल्लीतील आप सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि त्यांना खोटे आणि लुटमारीचे सरकार म्हटले. “आम्ही विकासावर विश्वास ठेवतो. पण, दुर्दैवाने, आम्ही प्रतिकूल परिस्थितीत विकास करत आहोत. दिल्लीत खोटे आणि लुट करणारे सरकार आहे. त्यांचे विचार टाळून पुढे जाणे आणि आम्ही ज्या नावाने ओळखले जातो ते करणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला नागरिकांचे म्हणणे ऐकायचे आहे,” असे भाजपा खासदार म्हणाले.

यापूर्वी भाजप नेते वीरेंद्र सचदेवा यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नववर्षानिमित्त खास पत्र लिहिले होते. “आपण सर्व लहानपणापासून नवीन वर्षाच्या दिवशी वाईट सवयी सोडून काहीतरी चांगले आणि नवीन करण्याचा संकल्प करतो. आज, नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी, सर्व दिल्लीवासीयांना आशा आहे की तुम्ही ते घडवून आणाल. खोटे बोलणे आणि फसवणूक करण्याच्या वाईट सवयी सोडून स्वतःमध्ये अर्थपूर्ण बदल करा,” असे भाजपा नेते वीरेंद्र सचदेवा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

याशिवाय त्यांनी केजरीवाल यांना पाच संकल्प ठरविण्यास सांगितले होते. दिल्लीतील दारूला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीतील जनतेची माफी मागावी. महिला, वृद्ध आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळणे केजरीवाल यांनी थांबवावे असा सल्लाही त्यांनी दिला होता.

हे ही वाचा :

आता पायाभूत सुविधा प्रकल्पालाही युनिक आयडी!

बांगलादेशी महिला चक्क पश्चिम बंगालमध्ये बनली सरपंच!

महाकुंभची जय्यत तयारी मात्र ‘समाजवादी’ला वावडे

“दुर्गम, माओवादग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक”

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहित भारतीय जनता पक्षाच्या कृतींशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएसला भाजप लोकशाही कमकुवत करत आहे असे वाटते का? असा प्रश्न विचारत केजरीवाल यांनी भाजपचे आचरण आणि त्याचा लोकशाहीवर होणारा परिणाम यासंबंधी विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा