28 C
Mumbai
Tuesday, October 22, 2024
घरराजकारण‘आंदोलकांनो अंतरवाली सराटीत येऊ नका, मला उमेदवार ठरवू द्या!

‘आंदोलकांनो अंतरवाली सराटीत येऊ नका, मला उमेदवार ठरवू द्या!

जरांगेंचे आवाहन, एक दिवस वाया गेला! फक्त फोटो, भेटी एवढंच झालं

Google News Follow

Related

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविणार असल्याचे जाहीर केले आहे. पण अद्याप त्यांचे उमेदवार ठरलेले नाहीत. किंबहुना, त्याची कोणतीही तयारी झालेली नाही. त्यामुळे काही दिवस अंतरवाली सराटीत येऊ नका, उमेदवार ठरवायचे आहेत, अशी सूचना जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केली आहे.

जरांगे यांनी सांगितले की, एक दिवस पूर्ण वाया गेला. फक्त फोटो काढणे आणि भेटी घेणे एवढेच झाले. पुढचे काम अजिबात झालेले नाही. तुम्ही मला नाव ठेवाल. त्यामुळे मला आता तीस-पस्तिस दिवस वेळ द्या. आपापल्या गावात राहा. चार पाच दिवस अंतरवाली सराटीत येऊ नका. त्यामुळे मला उमेदवार ठरवता येत नाहीए. ही माझी हात जोडून विनंती आहे.

हे ही वाचा:

‘चुकून पाठवला मेसेज’, ५ कोटीची मागणी करत धमकी देणाऱ्याने सलमानची मागितली माफी!

उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध

सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार

आझमगडमध्ये सामूहिक धर्मांतराचा डाव हाणून पाडला

जरांगे म्हणतात की, आम्ही तयारी सुरू केली आहे. जिथे आम्ही लढणार नाही, तिथे मेरिटप्रमाणे कोण आहे, ते आम्ही बघू. आमचे उमेदवार ठरले की मगच काय ते सांगू. तोपर्यंत संयम ठेवा. याआधी, रविवारी जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणुकीत उभे राहणार असल्याची घोषणा केली. जिथे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तिथे उमेदवार देणार तर जिथे शक्य नाही तिथे जो अन्य पक्षाचा उमेदवार असेल पण मराठा आरक्षणाला त्याचा पाठिंबा असेल त्याला जिंकण्यासाठी मदत करणार, असे जरांगे यांनी आवाहन केले होते. मराठा आणि मुस्लिम यांची क्षमता लक्षात घेतली जाईल, त्यातून एक समीकरण जुळविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही जरांगे यांनी म्हटले होते.

विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला होत आहेत तर निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. त्यामुळे ३०-३५ दिवसांचा अवधी सर्व पक्षांना मिळाला आहे. मात्र अद्याप जागावाटपाबाबत भाजप वगळता कुणालाही ठोस निर्णय घेता आलेला नाही. भाजपाने आपली ९९ उमेदवारांची यादी घोषित केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा