मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आक्षेपार्ह भाषा आणि त्यांचा बोलवता धनी कोण यावर विधानसभेत आणि विधान परिषदेत गदारोळ उठल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेतून टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर नरमाईची भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आंदोलन चालू असताना अनावधानाने होतं. आमचं बेमुदत उपोषण आहे. मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. मी शिव्या दिल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलले की, मी आई- बहिणीवरून शिव्या दिल्या. त्यांनी विधानसभेच्या पटलावर ही गोष्ट मांडली असं मी ऐकलं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, मी आई-बहिणीवरून बोललो असेन आणि ती गोष्ट फडणवीसांना लागली असेल तर मी त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. केवळ ते शब्द मागे घेतो.”
मनोज जरांगे पाटील असंही म्हणाले की, “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द निघाले असतील तर मी ते शब्द मागे घेतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन निघालो आहोत. त्यामुळे अनावधानाने कोणाच्याही आई-बहिणीवरून तोंडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी १०० टक्के ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.”
हे ही वाचा:
अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!
डाव्यांना केरळमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची आहे
अयोध्या, श्रीनगरमध्ये होणार ‘महाराष्ट्र दर्शन’
अजित पवारांकडून सभागृहात महिलांची ताकद दर्शवणारी शेरो शायरी
देवेंद्र फडणवीस विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार असल्याचा आरोप केला होता. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सागर बंगल्यावर येणार असा इशाराही दिला होता. यानंतर जरांगे यांनी माघार घेत उपोषण देखील स्थगित केले होते.