मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी

मुस्लीम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचे वक्तव्य

मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली असून निवडणुकीला एकत्र सामोरं जायचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुस्लीम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मोठा दावा केला. “मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहेत,” असं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं आहे.

“जरांगे मला मराठी शिकवतील. केवळ हिंदी बोलता येत नसल्याने मनोज जरांगे हरियाणात गेले नाही. त्यांना तिकडून बोलावणं आलं होतं. इतर ठिकाणीही बोलावलं होतं. मी आता त्यांच्यासोबत देशभर जाईल. त्यांचे मराठी भाषण हिंदीत अनुवादीत करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहेत. मनोज जरांगे यांच्या रुपात भारताला नवे बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहेत. जरांगे यांच्या रुपात नवे मौलाना आझाद मिळणार आहेत,” असं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं आहे.

हे ही वाचा : 

सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण

आमदार जयश्री जाधवांचा काँग्रेसला रामराम; शिवधनुष्य घेतले हाती

बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक

दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

मनोज जरांगे असेही पुढे म्हणाले की, “आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. जे नाव सांगेल त्यांनीच उमेदवारी ठेवायची, बाकीच्यांनी अर्ज काढून घ्यायचे. लोकशाही मार्गाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील. आपला समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला पाहिजे. तुम्ही मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, दलितांना काय दिलं आहे. गेल्या ७५ वर्षात वीज, पाणी यावरच बोलत आहेत,” असे मनोज जरांगे म्हणाले.

Exit mobile version