‘खुल्या जागेत नमाज नको’

‘खुल्या जागेत नमाज नको’

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे वक्तव्य

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी खुल्या जागेत नको, घरात नमाज अदा करा; असे वक्तव्य केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खुल्या जागेत नमाज अदा करण्याला गुरुग्राममध्ये विरोध होत आहे. आज स्थानिकांनी अजून कठोर भूमिका घेतली त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी नमाज अदा करण्यावरुन महत्त्वाचे वक्तव्य केले.

गुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधील मोकळ्या जागेत शुक्रवारच्या नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनोहर लाल खट्टर यांनी हे विधान केले आहे. ‘नमाज पठण करण्यासाठी काही खुल्या जागा राखीव ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घेण्यात आला असून राज्य सरकार या समस्येवर लवकरच तोडगा काढेल,’ असे खट्टर म्हणाले.

मनोहर लाल खट्टर हे आज एका कार्यक्रमादरम्यान  म्हणाले की, ‘त्यांना किंवा सरकारला कोणाचीही अडचण नाही. प्रत्येकाला आपल्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, मात्र प्रत्येकाने मर्यादेत राहून हे कार्य केले पाहिजे. मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी, दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे आहे. सरकार हे सहन करणार नाही.’

हे ही वाचा:

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास

तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?

… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद

बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

खुल्या जागेवर नमाज अदा करुन तणाव निर्माण करणे टाळावे, असे आवाहन हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत तणाव निर्माण होऊ दिला जाणार नाही. चर्चेतून मार्ग काढता येईल. पण इतरांची गैरसोय करुन चालणार नाही. व्यापक विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version