हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदीगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता भाजप हरियाणात स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे.मनोहर लाल यांच्याशिवाय संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे.सर्व मंत्र्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेत संपूर्ण मंत्रीमंडळाने आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.दरम्यान, भाजप आणि जेजेपी यांची युती तुटल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला आहे.
भाजप आणि जेजेपी यांची युती जवळपास साडेचार वर्षे होती.जेजेपी याच्या सोबत युती तुटल्यानंतर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे.त्यानुसार नायबसिंग सैनी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.नायबसिंग सैनी यांच्या नावाची चर्चा असली तरी याआधी कृष्णपाल गुर्जर यांचे देखील नाव चर्चेत आहे.
हे ही वाचा..
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!
“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”
दरम्यान, चंदिगढमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अपक्ष आमदारही पोहोचले आहेत. अपक्ष आमदार नयनपाल रावत यांनी मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आणि भेटीनंतर त्यांनी मोठं विधान केलं.भाजप आता स्वबळावर सत्ता स्थापन करणार असून भाजपासोबत अपक्ष आणि जेजेपीच्या पाच आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.