भारत ही लोकशाहीची जननी आहे

आदिवासी समाजाचे कौतुक करत 'मन कि बात' मध्ये , दिला पद्म पुरस्कारांचा हवाला

भारत ही लोकशाहीची जननी आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २०२३ वर्षातील पहिलाच मन कि बात हा रेडिओ कार्यक्रम सादर केला आहे आजचे त्यांचे हे ९७ वे पुष्प सकाळी अकरा वाजता सादर करण्यात आले होते . २५ डिसेंबर २०२२ ला मोदींनी ९६ वे पुष्प सादर केले होते.भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि आपला देश हा लोकशाहीची जननी आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या नसा नसात आहे, आपल्या संस्कृतीत आहे. शतकानुशतके आपल्या कार्याचाही तो एक अविभाज्य भाग आहे. लोकशाही हा आपल्या समाजाचा आता स्वभावच झाला आहे असे पंतप्रधान यावेळेस म्हणाले.

मन की बातचा ९७ वा भाग
पंतप्रधान मोदींनि आज मन कि बात चे ९७ वे पुष्प दादर केले . मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान अनेकदा लोकांना अनेक प्रेरणादायी गोष्टी, माहिती देतात. आज पंतप्रधानांनी त्यांच्या शेवटच्या भागामध्ये साहिबजादांच्या धैर्याची कहाणी सांगितली.

आदिवासी समाज आपल्या परंपरा जतन करण्यास उत्सुक’
पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोक येतात. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे, त्याला स्वतःची आव्हाने देखील आहेत. एवढे सगळे करूनही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. असे पंतप्रधान म्हणाले.

आदिवासी भाषांवर काम करणाऱ्यांना पद्म पुरस्कार’
टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा यांसारख्या आदिवासी भाषांवर काम केलेल्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी  खरोखरच अभिमानाची बाब आहे. सिद्दी, जारवा आणि ओंगे आदिवासींसोबत काम करणाऱ्यांनाही यावेळी बक्षीस देण्यात आले आहे.  मन की बात कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित केला जातो, ज्याद्वारे पंतप्रधान देशभरातील लोकांशी संवाद साधतात. त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रमाची ही ९७ वी आवृत्ती होती

Exit mobile version