आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यापुर्वी प्रचारादरम्यान भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आसाममध्ये सत्ता स्थापन झाल्यास सीएए लागू करणार नाही असे विधान केले होते. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टिका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीटर वरून टिका करताना मनमोहन सिंग हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते असताना पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान या देशांतील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणार्थ कायदा हवा असे भाषण केले होते, त्याची आठवण करून दिली आहे. त्याबरोबरच सीएएच्या रुपाने हेच मोदी सरकारने सत्यात उतरवले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. आता तेच मनमोहन याचा जोरदार विरोध करतात, हाच काँग्रेसचा खरा चेहरा असल्याचे भातखळकरांनी म्हटले आहे.
डॉ.मनमोहन सिंह यांनी राज्यसभेत विरोधीपक्षनेते असताना पाकिस्तान, बांगलादेश,अफगाणिस्तानातील हिंदू आदी अल्पसंख्यकांसाठी कायदा हवा यासाठी जोरदार भाषण ठोकले होते. पंतप्रधान मोदींनी CAAच्या रुपात हे प्रत्यक्षात आणले.आता तेच मनमोहन याचा जोरदार विरोध करतायत.हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे. pic.twitter.com/DrHdKYXCs2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 27, 2021
हे ही वाचा:
क्रिकेटच्या देवालाही कोरोनाची लागण
कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?
नवाब मलिक, रिपोर्ट फोडला तर फोडला म्हणा, घाबरता कशाला?
राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९, मोदी सरकारने मंजूर करून घेतला होता. या कायद्याने पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान या देशांतील अल्पसंख्यांक जैन, बौद्ध, हिंदु यांना भारतात ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारताचे नागरिकत्व बहाल करणारा होता. परंतु त्यानंतर विरोधी पक्षांकडून गैरसमज पसरवले गेल्याने या कायद्याला विरोध केला जाऊ लागला. या कायद्याच्या विरोधात काही पक्षांकडून आंदोलन देखील करण्यात आले होते, जे आंदोलनदेखील वादग्रस्त ठरले होते.