‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या ‘टेन फ्लॅश पॉइंट्स, ट्वेंटी इयर्स’ या पुस्तकात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली आहे. २००८ मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी (२६/११) त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीका केली आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कोणतीही कारवाई न केल्याने ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी असल्याचे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

दरम्यान मनीष तिवारी यांच्या पुस्तकाच्या संदर्भावरून भाजपने मनमोहन सिंग सरकारवरही हल्लाबोल केला आहे. या संदर्भात नुकतेच राष्ट्रीय प्रवक्ते बनलेले शहजाद पूनावाला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा:

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आपल्याच कार्यालयावर दगडफेक

शहजाद पूनावाला यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “मनीष तिवारी यांनी त्यांच्या आगामी पुस्तकात २६/११ नंतर संयमाच्या नावाखाली यूपीए सरकारच्या कमकुवतपणावर टीका केली आहे. त्यांनी पुढे लिहिले की, एअर चीफ मार्शल फली मेजर यांनी आधीच सांगितले आहे की, हवाई दलाला २६/११ चा बदला घ्यायचा होता, परंतु यूपीएने थांबवून ठेवले होते. काँग्रेस २६/११ साठी हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानला वाचवण्यात व्यस्त होती, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचे हे चौथे पुस्तक आहे. या पुस्तकात मागील २० वर्षांचा लेखाजोखा या पुस्तकात दिला आहे. या पुस्तकात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Exit mobile version