‘चन्नी, सिद्धू मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाहीत’

‘चन्नी, सिद्धू मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाहीत’

काँग्रेस नेते मनीष तिवारींचा घरचा अहेर

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केल्यावर राज्यातील पक्षाचे खासदार मनीष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले , हे दोघेही या सर्वोच्च पदासाठी पात्र नाहीत.
पंजाबमधील काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहे, पण अद्याप मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही.

पक्षाचे सहकारी नेते मनीष तिवारी यांनी चन्नी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, राज्याला आव्हानांना तोंड देणारा आणि कठोर निर्णय घेणारा नेता हवा आहे. मुख्यमंत्र्यांच्या अलीकडील टिप्पण्यांच्या अहवालाचा हवाला देऊन ते म्हणाले की पंजाबला “गंभीर” नेत्याची गरज आहे.

चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी नेतृत्वावर दबाव आणल्याच्या वृत्ताला टॅग करत तिवारी यांनी ट्विट केले. “पंजाबला गंभीर लोकांची गरज आहे. ज्यांचे राजकारण सोशल इंजिनियरिंग, करमणुकीचे, उथळ नाही आणि सलग निवडणुकांमध्ये लोकांनी नाकारलेल्या सरकारचे नाही, अशांची गरज आहे.”

हे ही वाचा:

१८ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार भलामोठा लघुग्रह!

दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला

छगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान  

वरण भात लोन्चा, व्हीडिओ नाय आता कोन्चा…

 

मात्र तिवारी यांनी ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी, तिवारी यांचे हे ट्विट चन्नी, सिद्धू आणि राज्य प्रचार समितीचे प्रमुख सुनील जाखर यांना उद्देशून होते. अलीकडच्या काळात, विरोधी पक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे आणि असे म्हटले आहे की त्यांच्याकडे राज्य युनिटचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पक्षाचे नेते सुनील जाखर यांच्यासह अनेक मुख्यमंत्रिपदाचे इच्छुक आहेत. आगामी काळात सिद्धू कसे वागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version