चन्नी यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जनतेला ‘भैया’ म्हणून संबोधले होते आणि अशा भैय्यांना पंजाबमध्ये थारा देऊ नका असे म्हटले होते. त्यावर त्या सभेत उपस्थित प्रियांका गांधी यांनी टाळ्याही वाजवल्या होत्या. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस अडचणीत आली होती. आता काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.
या ‘भैया’ वादावरून श्री आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले, ” असे राज्यावरून कोणाला संबोधने चुकीचे आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने असे कृत्य करू नये. देशाच्या घटनेने कोणालाही कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला आहे. माझे वडील हिंदू होते आणि त्यांनी पंजाबसाठी बलिदान दिले. माझी आई जाट कुटुंबातील आहे. पंजाबचे मन मोठे आहे. येथे संकटात सापडलेले लोक सर्वांच्या मदतीसाठी तयार आहेत.”
त्यावरून त्यांनी त्यांचा अनुभवही सांगितला आहे ते म्हणाले, जेव्हा ते पहिल्यांदा लुधियानामधून निवडणूक लढवायला गेले होते तेव्हा सगळे त्यांना भैया असे म्हणत असे. यानंतर नंदपूरमधून निवडणूक लढवतानाही अकाली दल त्यांना भैया म्हणत असे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्याचे काँग्रेस खासदार तिवारी यांनी सांगितले आहे. त्यांनी हा शब्द फक्त अरविंद केजरीवाल यांच्यासाठी वापरल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी
पत्रकारपरिषदेनंतर नारायण राणेंना मुंबई महापालिकेकडून नोटीस
‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा
दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणूकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे. प्रियांका गांधी यांच्यासह प्रचार करत असताना चन्नी यांनी प्रियांका यांचा पंजाबची सून असा उल्लेख करत स्तुतीसुमने उधळली मात्र यूपी बिहार यांना भैया असे संबोधल्याने चन्नी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मतदानापूर्वी असा वाद पक्षासाठी घातक ठरू शकतो.