आसाम, पंजाब आणि आता उत्तराखंड; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर  

आसाम, पंजाब आणि आता उत्तराखंड; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर  

काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू असून आता पंजाबपाठोपाठ उत्तराखंडमध्येही काँग्रेसमध्ये कलह सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी वरिष्ठ नेतृत्व आणि पक्षाच्या नेत्यांबाबत खळबळजनक ट्विट केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. रावत यांनी ट्विट करून म्हटले होते की, ‘हे काही विचित्र आहे, बहुसंख्य ठिकाणी सहकाराचा हात पुढे करण्याऐवजी सहकार्याची संघटना एकतर पाठ फिरवत आहे किंवा नकारात्मक भूमिका घेत आहे. कामगिरी करत आहे. ज्या समुद्रामध्ये पोहायचे आहे तिथे मगर सोडून ठेवल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यानुसार वागावे लागते, असे ट्विट केले आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नेते मनीष तिवारी यांनीही यांनीही काँग्रेसची खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या ट्विटवर मनीष तिवारी यांनी लिहिले की, ‘आसाम, नंतर पंजाब आणि आता उत्तराखंड, कोणतीही कसर सोडणार नाही.’

मनीष तिवारी यांनी याआधीही पक्षावर उघडपणे टीका केली आहे. यापूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवल्यानंतरही त्यांनी काँग्रेस हायकमांडवर निशाणा साधला होता. यासोबतच त्यांनी राहुल गांधींना हिंदुत्वाच्या वादात न पडण्याचा सल्ला दिला होता. कारण हा वाद पक्षाच्या मूळ विचारसरणीशी जुळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खोचक ट्विट केले आहे की, तुम्ही जे पेराल तेच कापाल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! या अंतर्गत कलहाचे परिणाम काँग्रेसला आता उत्तराखंडमध्येही भोगावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version