सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मनीष दळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. ११ विरुद्ध ७ मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली. संतोष परब हल्लाप्रकरणी मनीष दळवी हे आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे सावट या निवडणुकीवर होते. पण या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या संचालकांच्या निवडणुकीत भाजपाने ११ विरुद्ध ८ अशी बाजी मारून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता.
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अध्यक्षपदासाठी दळवी यांचे नाव सुचविले होते. उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव होते त्यांनीही ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे भाजपाचा वरचष्मा या निवडणुकीत पाहायला मिळाला.
हे ही वाचा:
वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?
अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट
ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्यात भाजपाने ११ तर महाविकास आघाडीने ८ जागी विजय मिळविला होता. त्यामुळे भाजपाचे वर्चस्व या निवडणुकीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर कोण याची चर्चा सुरू होती. पण आता त्यात भाजपानेच बाजी मारल्याचे दिसते आहे. अध्यक्षपदासाठी नारायण राणे कुणाचे नाव सुचवितात हे पाहणे औत्सुक्याचे होते. अखेर त्यांनी मनीष दळवी यांनाच संधी दिली आणि त्यांना ११ विरुद्ध ७ मतांनी बाजी मारली. महाविकास आघाडीचे ८ संचालक निवडून आलेले असतानाही त्यातील एका संचालकाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हजेरी लावली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ७ मतेच पडली.