माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

भारतीय जनता पार्टीने आज त्रिपुराचे मुख्यमंत्री विपलब देब यांचा राजीनामा घेत सगळ्यांनाच धक्का दिला. तेव्हापासूनच मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली होती. याचेच उत्तर आता मिळाले आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटातर्फे माणिक सहा यांना विधिमंडळे गटाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे माणिक सहा आता त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

शनिवार, १४ मे रोजी अचानकपणे त्रिपुराचे मुख्यमंत्री विपलब देब यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले. पुढल्या वर्षी २०२३ मध्ये त्रिपुरामध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे मुख्यमंत्री बदलाचा पॅटर्न त्रिपुरामध्येही राबवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलून नवे मुख्यमंत्री निवडण्याच्या सर्व प्रक्रियेच्या देखरेखीसाठी केंद्रातून मंत्री भूपेंद्र यादव आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या दोघांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. त्यांच्या देखरेखीखालीच माणिक सहा यांची नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाचा:

केतकी चितळेवर शाई आणि अंडीफेक

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

एलोन मस्क यांनी थांबवली ट्विटरची बोली

माणिक सहा हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य आहेत. फेब्रुवारी महिन्यातच त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. तर २०२० पासून ते भाजपचे त्रिपुरा राज्याचे अध्यक्ष देखील आहेत. २०१६ साली माणिक सहा हे कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले.

माणिक सहा हे पेशाने डेंटिस्ट असून ते त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापनही करत होते. तर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष म्हणूनही ते कामकाज पाहत आहेत.

Exit mobile version