विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून गेल्या तिन्ही दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला हजर राहिले नव्हते. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी अनोख्या पद्धतीने सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मंगेश चव्हाण हे आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ‘सरकार हरवले आहे’ असा संदेश लिहिलेले शर्ट घालून आले.

मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि त्यावर सरकार हरवलं आहे असा संदेश असणारे शर्ट घातले आहे. या शर्टच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला टोला लगावला आहे. आजही विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. वीज बील वसुली, शेतकरी प्रश्न, परीक्षा घोटाळे यावरून विरोधकांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे सध्या अधिवेशनाला आणि त्यापूर्वीही अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित होते. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी या पदाची जबाबदारी काही काळासाठी इतर कोणाकडे सोपवावी असेही सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते उपस्थित नाहीत हे स्वाभाविक आहे. परंतु, परंपरेनुसार त्यांनी इतर कुणालातरी या पदाची जबाबदारी द्यावी. मात्र, त्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास नसल्यामुळे हा चार्ज अजुनही देण्यात आलेला नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना जर त्यांच्या पक्षात कोणावर विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते, असेही चंद्रकांत पाटील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  म्हणाले होते.

Exit mobile version