वंचितकडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द!

उमेदवारी रद्द करण्यामागे पक्षाने दिले स्पष्टीकरण

वंचितकडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द!

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.मात्र, पक्षाकडून आता त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीकडून ट्विटकरत याची माहिती दिली.तसेच उमेदवारी रद्द करण्याचे कारणही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी व्हिडिओ जारी करत ट्विट करून याची माहिती दिली.वंचित बहुजन आघाडीकडून ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे की, मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

हे ही वाचा.. 

“विरोधकांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे”

गोळ्या झाडल्या, दगड उचलले; पाकिस्तानी संघाची अजब क्रिकेट ट्रेनिंग

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!

१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे, असे ट्विट पक्षाकडून करण्यात आले आहे.

 

Exit mobile version