कुरार मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी सामान्य मराठी माणसाची घरे जमीनदोस्त करण्याचे काम ठाकरे सरकारने केले. या कारवाईला विरोध करणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यात आली. तर सर्वसामान्यांसाठी आवाज उठवणारे स्थानिक लोकप्रतिनिधी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनादेखील अटक करण्यात आली. या सर्व प्रकारची माहिती कळताच भाजपाचे नेते घटनास्थळी दाखल झाले. यात मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार यांचा समावेश होता.
शनिवार, १७ जुलै रोजी ठाकरे सरकारने मुंबईतील कुरार परिसरातील मराठी माणसाच्या घरांवर बुलडोझर फिरवला. एकीकडे पावसाळा आणि कोविडची ही परिस्थिती बघता लोकांना बेघर करु नये असे देण्यात आलेले न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवत ठाकरे सरकारने ही कारवाई केली. या सर्व कारवाई दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नेते पहिल्यापासूनच नागरिकांसाठी आवाज उठवत होते.
हे ही वाचा:
…पुरावा द्या, नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकतो!
विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा
टाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण
कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…
स्थानिक आमदार अतुल भातखळकर हे सर्वप्रथम ही कारवाई रोखण्यासाठी कुरार येथे पोहोचले. पण पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या कारवाईनंतर भाजपा जास्तच आक्रमक झाली. या सर्व कारवाई विरोधात भाजपा नेते मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार या सर्वांनीच आवाज उठवत कुरार येथील रहिवाश्यांसाठी न्याय मागीतला.
सरकारच्या जुलमी कारवाईचा निषेध – प्रविण दरेकर
विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सरकारची ही कारवाई जुलमी असल्याची म्हणत त्याचा निषेध केला आहे. दरेकर यांनी कुरार परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि स्थानिकांची भेट घेतली. ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या मनमानी प्रकारच्या कारवाईला विरोध करणारे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांना आमदार भातखळकर यांना आरे पोलीस ठाण्यात नेले. दरेकर यांनी आरे पोलीस ठाण्यात जाऊन आमदार भातखळकर यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना दरेकर यांनी सांगितले की, जे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत मूर्त स्वरूप घेतलेले होते व अंतिम टप्प्यात आले त्यांचे लवकरात लवकर आपल्या हातून उदघाटन व्हावे असे महाविकास आघाडी सरकारला वाटते आणि त्या प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी साम, दाम, दंड वापरून अशा प्रकारची कारवाई होत असून ते अत्यंत चुकीचे असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
मालाड, कुरार परिसरातील घरांवर राज्य सरकारने अतिशय जुलमी पद्धतीने कारवाई केली असून सामान्य जनतेवर अशा पद्धतीने केलेल्या मनमानीच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. pic.twitter.com/0W8yOxk2ho
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 17, 2021