जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसे पराभूत

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसे पराभूत

जळगाव दूध संघ ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. अप्रत्यक्षपणे ही निवडणूक भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात लढवली गेली होती. दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर लक्षात घेता ही निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली होती. त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना जिकून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील मोठी ताकद लावली होती. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. या निवडणुकीत खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजप कडून मंगेश चव्हाण तर महाविकास आघाडी पॅनलकडून मंदाकिनी खडसे यांनी निवडणूक लढवली होती. मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांचा ७६ मतांनी पराभव करत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाची कमान आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. आम्हाला परभव मान्य आहे, पण विरोधकांनी खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी निवडणूक निकालावर आपली प्रतिक्रिया देताना केला आहे. खोक्याचा दबाव, आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकली असल्याचेही खडसे म्हणाले.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील बडे प्रस्थ मानले जाते. दूध संघाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत खडसे यांनी आपली पत्नी मंदाकिनी खडसे याना रिंगणात उतरवले होते. या निडणुकीत आपणच जिंकणार असा एकनाथ खडसे यांचा होरा होता. परंतु भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अचानक निवडणूक उमेदवारीसाठी अर्ज भरून खडसे यांना आव्हान दिले. चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून आपला अर्ज दाखल केला होता. गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलकडून मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. दुसऱ्या बाजूला मंदाकिनी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलकडून अर्ज भरून चव्हाण यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांच्या उमेदवारीवर खडसे यांनी हरकतही घेतली होती.

Exit mobile version