अजबच!! अजानच्या वेळेला घरात स्पीकर लावल्याबद्दल पोलिसांत तक्रार

अजबच!! अजानच्या वेळेला घरात स्पीकर लावल्याबद्दल पोलिसांत तक्रार

सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात लाऊडस्पीकरवरून राजकारण तापलेले असताना महाराष्ट्रातील औरंगाबादेत मशिदीत अजान सुरू असताना एका घरात स्पीकरवर गाणी लावल्यामुळे त्या व्यक्तीविरोधात तक्रार करण्यात आल्याचा अजब प्रकार घडला आहे.

किशोर मालकुनाईक यांच्याविरोधात शहर पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अमृतसाई प्लाझा या इमारतीत मालकुनाइक कुटुंब राहते. आपल्या घरात त्यांनी ब्लूटूथ स्पीकरवर गाणी लावली होती. त्याचवेळी इमारतीसमोर असलेल्या मशिदीत अजान सुरू होती. त्यांच्या त्या गाण्यांनी काही लोकांना त्रास झाला. त्यांनी पोलिसांत याविरोधात तक्रार केली. मालकुनाईक हे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या बायकोचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी घरात गाणी लावली होती. संध्याकाळी ७ वाजता अजान असतानाच गाणी लावल्यामुळे काही लोकांनी आक्षेप घेतला.

दिव्य मराठीने यासंदर्भातील वृत्त दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार शेख शफिक, शेख शब्बीर, इम्रान खान, मुदस्सर अन्सारी यांनी ही तक्रार केली. पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थिती पाहिली. त्यांनी मालकुनाईक यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांनी स्पीकर लावलेला असल्याचे दिसले. मालकुनाईक यांनीही आपण गाणी लावल्याचे सांगितले. त्यांच्याविरोधात ५०५ (ब) आणि (क) हे कलम लावण्यात आले. एखाद्या समाजाला उद्युक्त करण्याचा गुन्हा मालकुनाईक यांच्याविरोधात दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:

वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण

हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा

किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!

अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!

 

मालकुनाईक म्हणाले की, आम्ही अनेक वर्षे इथे राहात आहोत आणि कधीही इथल्या रहिवाशांशी आमचा वाद झालेला नाही. मी जर माझ्या घरात गाणी लावली तर त्याचा त्रास कुणाला का व्हावा. यामागे काहीतरी कारस्थान आहे. आपण ही गाणी अजानच्या वेळेला मशिदीसमोर लावलेली नाहीत.

Exit mobile version