कर्नाटक विधानसभेचे अर्थसंकल्पीय सत्र सुरू असतानाच शुक्रवारी एक ७० वर्षीय व्यक्ती बेकायदा विधानसभेत शिरली आणि ती चक्क जनता दल पक्षाच्या आमदाराच्या जागेवर जाऊन बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या माणसाला नंतर अटक करण्यात आली. त्याला केवळ अर्थसंकल्पीय सत्रात हजेरी लावायची असल्याने त्याने विधानसभेत बेकायदा प्रवेश केला, अशी कबुली या वृद्धाने दिली आहे. मात्र या घटनेमुळे कर्नाटक विधानसभेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही व्यक्ती कर्नाटकमधील चित्रदुर्गा जिल्ह्यातील होती. केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावायची असल्याने ती येथे आली होती. नंतर ही व्यक्ती संपूर्ण विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यग्र असतानाच तेथील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे आमदार करियम्मा यांच्या खुर्चीवर स्थानापन्न झाली. या वृद्धाला अटक करण्यात आली आहे. जेव्हा त्यांना रोखण्यात आले, तेव्हा त्यांनी ते आमदार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही
बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’
ब्रिटनला भारताने ठणकावले; भारतविरोधी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करा
सांताक्रूझच्या बड्या रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरांचा लैगिंग छळ, सहकारी डॉक्टर विरोधात गुन्हा
मात्र यासाठी ठोस पुरावा म्हणून ते काहीही सादर करू शकले नाहीत. त्यानंतर सुरक्षा रक्षकांना बोलावून त्यांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत विधानसभा अध्यक्षांनाही कळवण्यात आले. संबंधित यंत्रणेने लागलीच तपासाची चक्रे फिरवून या व्यक्तीला घटनेच्या काही तासांतच अटक केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी यावेळी राज्याचा १४वा विक्रमी अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. कर्नाटकमधील सत्तांतरानंतर हा काँग्रेसचा पहिलाच अर्थसंकल्प आहे.