ठाकरे सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव घेऊन प्रतीक काळे या तरुणाने आत्महत्या केली. तरीही या प्रकरणात मंत्री शंकरराव गडाख यांची साधी चौकशीही होत नाहीये. त्यामुळे या प्रकरणात पोलिस तपास निपक्षपाती होत नसून पोलिसांवर दबाव असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण चांगलाच गाजणार असल्याचे म्हटले जात आहे.
नगर जिल्ह्यातील दंत चिकित्सा महाविद्यलयात कार्यरत असणाऱ्या प्रतीक काळे नामक तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांचा स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होता. प्रतीक काळे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली असून आत्महत्येआधी त्याने एक लेखी मेसेज, एक ध्वनिफीत आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
हे ही वाचा:
टीम इंडियाची आज अस्तित्वाची लढाई
‘…अन्यथा आत्मदहन करू’ ! शिक्षकांचा ठाकरे सरकारला इशारा
ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक
फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू
या व्हिडिओमध्ये मृत प्रतीक काळे याने काही नावे घेत गंभीर आरोप केले होते. आपल्याला मानसिक त्रास देऊन आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे अप्रत्यक्षपणे प्रतीक काळेने या व्हिडिओमध्ये म्हटले होते. यात राज्याचे मंत्री शंकरराव गडाख यांचेदेखील नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणात शंकरराव गडाख यांचे नावच आलेले नाही.
यावरून राज्याचे राजकारण तापताना दिसत असून भाजपा या प्रकरणात आक्रमक झालेली दिसत आहे. भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. गडाख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे. तर या प्रकरणात पोलिस तपासावर दबाव असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.