…पडळकरांच्या गाडीवर हल्ला करण्याची म्हणून झाली ‘छाती’

…पडळकरांच्या गाडीवर हल्ला करण्याची म्हणून झाली ‘छाती’

भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना गेल्या महिन्यात राज्यात घडली होती. या प्रसंगी पोलिसांनी कारवाई करत अमित सुरवसे याला अटक करण्यात आली होती. पण या प्रकरणात आता एक नवी बाब समोर आली आहे. हल्लेखोर अमित सुरवसे याच्या छातीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा टॅटू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळेच पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची बाब अधोरेखित होताना दिसत आहे.

आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर गेल्या महिन्यात दगडफेक करण्यात आली होती. आपल्या घोंगडी बैठकांच्या निमित्ताने सोलापूर भागात दौरा करत असताना ३० जून रोजी पडळकर यांच्यावर हा हल्ला झाला. ३० जूनच्या रात्री एक घोंगडी बैठक संपवून दुसऱ्या बैठकीसाठी रवाना होत असतानाच पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली. एक मोठा दगड उचलून त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर फेकण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी पडळकर यांच्या गाडीचे मात्र नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी

आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

ठामपा उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा…हकालपट्टीसाठी भाजपा आक्रमक

या हल्ल्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत जोरदार हल्ला चढवला होता. आपण शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आपल्यावर हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले होते. तर राष्ट्रवादीकडून मात्र हे आरोप फेटाळले गेले होते. या प्रकरणाचे व्हिडिओही समोर आले असून या व्हिडिओचे आधारे पोलिसांनी पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या अमित सुरवसे या तरुणाला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात आता एक नवी माहिती समोर आली आहे. दगडफेक करणारा अमित सुरवसे याच्या छातीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा टॅटू असल्याची माहिती मिळत आहे. टीव्ही ९ मराठी या वाहिनीने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

Exit mobile version