ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

ममता बॅनर्जी यांनी काल (१० मार्च) नंदीग्राममधून विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पदयात्रा, रोड शो असे अनेक प्रकार केले. या सगळ्याच्या शेवटी त्या त्यांच्या गाडीत बसत असताना त्यांना कोणीतरी धक्का दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत होऊन त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत.

ममता बॅनर्जींनी असे सांगितले आहे की त्या गाडीत बसत असताना त्यांना कोणीतरी धक्का दिला आणि त्यातून त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना कोलकाताच्या सेठ सुखलाल करनानी मेमोरियल (एसएसकेएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या डाव्या घोट्याला आणि बोटाला जखम झाल्याचे कळले. त्यांचा डावा पाय आता प्लास्टरमध्ये ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नंदिग्राममध्ये आज ममता-सुवेंदू आमने सामने

या सर्व प्रकारावर जेंव्हा तिथल्या स्थानिकांना विचारण्यात आले तेंव्हा असे कळले की त्यांना कोणी धक्का दिला नव्हता. त्याच भागामध्ये असलेल्या एका लोखंडी खांबाला त्यांची गाडी आदळल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना कोणीही धक्का दिला नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. भाजपा, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी हा ममता बॅनर्जींचा राजकीय ‘स्टंट’ असल्याची टीका केली आहे. तर भाजपाने या सर्व प्रकारची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे.

Exit mobile version