बंगालमध्ये ममतांच्या ‘भद्रलोक’चा कहर

बंगालमध्ये ममतांच्या ‘भद्रलोक’चा कहर

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमुल काँग्रेसचे अनेक नेते ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये गेले. अशा परिस्थितीत आता पक्षातील उरलेले नेतेही ममता बॅनर्जी यांची फारशी साथ देतील की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नुसरत जहाँ पश्चिम बंगालमध्ये रोड शो करतानाचा हा व्हीडिओ आहे. यावेळी तृणमुलचे काही नेते त्यांना आणखी काही काळ प्रचार करण्यासाठी गळ घालताना दिसत आहेत. मात्र, नुसरत जहाँ यांनी त्यांची मागणी सरळ धुडकावून लावली.

गेला तासभर मी प्रचार करत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठीही मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करणार नाही, असे सांगत नुसरत जहाँ प्रचारासाठीच्या गाडीतून उतरत तरातरा निघून गेल्या. त्यांचा हाच व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत बंगाल भाजपने त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

हे ही वाचा:

भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये ८०% तर आसाममध्ये ७३% मतदान

महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी

पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी

पश्चिम बंगालमधील राजकारणात या निवडणुकीत आमूलाग्र परिवर्तन होताना दिसत आहे. कोलकात्त्यातील ‘भद्रलोक’ आणि उर्वरित पश्चिम बंगालमधील सामान्य बंगाली अशी ही लढत दिसत आहे. भाजपा ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला कोलकात्त्यातील ‘भद्रलोक’ पार्टी ठरवू पाहत आहे. भद्रलोक हा एक बंगाली शब्द आहे ज्याचा अर्थ समाजातील श्रेष्ठ लोक असा होतो. नुसरत जहाँच्या या व्हिडिओने भाजपाच्या प्रचाराला खतपाणीच घातलं आहे.

Exit mobile version