ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!

काँग्रेसचे अधीररंजन यांचा विरोध

ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!

तृणमूल काँग्रेस पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’गटाचा भाग असल्याचे गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष इंडिया गटाला बाहेरून पाठिंबा देईल, असे त्यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तथापि, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी आघाडी सोडून पळून गेल्या, अशी टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, तृणमूल काँग्रेस ‘इंडिया’चा भाग आहे. परंतु प. बंगालमध्ये काँग्रेस, माकप आणि त्यांचा पक्ष यांच्यात कोणतीही युती नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘भाजपच्या निधीतून मतांचे विभाजन करण्याच्या काँग्रेस आणि माकपच्या प्रयत्नांना विरोध केला पाहिजे. त्यांना येथे मतदान करू नका. मी स्पष्ट केले आहे की बंगालमध्ये कोणतीही युती नाही, परंतु आम्ही देशात आघाडीसोबत आहोत. आम्ही असेच राहू,’ असे बॅनर्जी हल्दिया येथील निवडणूक प्रचारफेरीत म्हणाल्या.

हे ही वाचा:

टी – २० विश्वचषक स्पर्धेसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

उबाठा नेत्याच्या डोक्यावर महाराजांचे जिरेटोप कसे चालतात ?

आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाब आणि बुरख्यावर बंदी

‘मोदींचे हात बळकट करा… तेच तुम्हाला या वादळातून सुखरूप तारतील’

‘मी इंडिया आघाडीची स्थापना केली आणि त्याला पाठिंबा देत राहीन. त्याबद्दल कोणताही गैरसमज नसावा,’असे त्या म्हणाल्या. मात्र, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांवर अविश्वास व्यक्त करत त्यांनी आधीच आघाडी सोडल्याचे सांगितले. ‘माझा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांनी आघाडी सोडून पळ काढला. त्या भाजपच्या दिशेनेही जाऊ शकतात. त्या काँग्रेस पक्ष नष्ट करण्याविषयी आणि काँग्रेसला ४०पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे बोलत होत्या आणि आता त्या असे म्हणत आहेत. याचा अर्थ काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी सत्तेवर येत आहे,’ असे चौधरी म्हणाले.

Exit mobile version