ममता बॅनर्जींचा रथयात्रेलाही विरोध?

ममता बॅनर्जींचा रथयात्रेलाही विरोध?

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी शुक्रवारी सांगितले की “कोणतेही जिल्हा प्रशासन पक्षाच्या प्रस्तावित रथयात्रेवर बंदी घालू शकत नाही.” विजयवर्गीय म्हणाले की विरोधी पक्ष म्हणून लोकांपर्यंत जाण्याचा भाजपचा मूलभूत अधिकार आहे.

“न्यायालयाने रथयात्रेला स्थगिती दिलेली नाही. म्हणून जिल्हा प्रशासन हे थांबवू शकत नाही. विरोधीपक्ष म्हणून लोकांमध्ये राहणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे.  फेब्रुवारीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यात्रेचे उद्घाटन करतील आणि ११ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शहा कूचबिहार येथून आणखी एका यात्रेला हजेरी लावतील, ” असे विजयवर्गीय यांनी सांगितले.

एप्रिल ते मे या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये पाच मेगा रथयात्रा करण्याची भाजपची योजना आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा उदयास आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) दहा वर्षांचे शासन संपुष्टात आणून राज्यात आपले पहिले सरकार स्थापन करण्याचे उद्दीष्ट भाजपाचे आहे.

२३ जानेवारीच्या सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ममता बॅनर्जी मंचावर होत्या. तेंव्हा कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या. ममता बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’ हा त्यांचा अपमान वाटला आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला.

हे ही वाचा: https://www.newsdanka.com/politics/mamata-didnt-speak-after-jai-shree-ram/3906/

त्यानंतर आता ममता बॅनर्जींच्या सरकारने रथ यात्रेलाही परवानगी देणार नसल्याचे भाजपाने सांगितले आहे.

Exit mobile version