ममता बॅनर्जींना अजून एक नोटीस

ममता बॅनर्जींना अजून एक नोटीस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. केंद्रीय पोलिसांना घेराव घाला आणि अडवा असं आवाहन ममता बॅनर्जींनी एका प्रचार सभेत केलं होतं. या आवाहनावरूनच त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या त्यांच्या वक्तव्यातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून, मतदानाच्या दिवशी मतदारांना घाबरवून, निवडणूक जिंकण्याचा ममतांचा डाव असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

या पूर्वीही ममता बॅनर्जींना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांना एकत्र येऊन तृणमूल काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मुस्लिमांनी मतदान करताना मत वाया घालवू नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार करताना ममता बॅनर्जींनी हे विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती.

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला होता. “ममता बॅनर्जी मुस्लिम व्होटबँकेच्या नावावर मते मागत असल्याचा आरोप करतानाच आम्ही हिंदूनो एक व्हा म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला नोटीस पाठवली असती”, अशी टीका मोदींनी केली होती.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

ममतांच्या भवानीपूरमध्ये अमित शहांचा झंझावात

भवानीपूरमध्ये तृणमूलच्या गुंडांचे शेवटचे प्रयत्न उघड

महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?

आज भवानीपूर या ममता बॅनर्जींच्या मतदार संघामध्ये घरोघर जाऊन प्रचार करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय सुरक्षा रक्षक हे निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात. आज बंगालमध्ये तुलनेने जो कमी हिंसाचार बघायला मिळत आहे तो केंद्रीय सुरक्षा रक्षकांमुळेच. असेही अमित शाह म्हणाले.

Exit mobile version