‘जय श्रीराम’ च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जींनी केले भाषण बंद

‘जय श्रीराम’ च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जींनी केले भाषण बंद

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कोलकात्यात झालेल्या शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. मोदींच्या भाषणा आधी ममता दीदी बोलायला उभ्या राहिल्या असताना प्रेक्षकांतून ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्या नंतर भडकलेल्या ममता बॅनर्जी भाषण न करता निषेधाचा सूर लावून त्या खाली उतरल्या.

आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ वी जयंती देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी होत आहे. ‘व्हिक्टोरिया मेमोरियल’ येथे होत असलेल्या कार्यक्रमात ममता दीदींना देखील बोलण्यासाठी पाचारण करण्यात आले परंतु त्या बोलायला उभ्या राहिल्या. त्यानंतर श्रोत्यांमधून ‘जय श्री राम’ अशा घोषणा करण्यात आल्या. त्यावर संतापून “मी नरेंद्र मोदी आणि सांस्कृतीक मंत्रालयाची कोलकात्यात कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपली आभारी आहे, परंतु कोणाला कार्यक्रमासाठी बोलवून त्याचा अपमान करणे आपल्याला शोभत नाही.” असे बोलून व्यासपीठावरून खाली उतरल्या. श्रोत्यांनी दिलेल्या ‘जय श्री राम’ या घोषणांत ममता बॅनर्जी यांना आपला अपमान झाला असे वाटले.

लवकरच बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सर्व पक्ष कसून तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या कार्यक्रमात त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणांमुळे आपला अपमान झाला असे मानले.

Exit mobile version