पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची जागा त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी घेणार आहेत. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोमवारी ही माहिती दिली. हुगळी जिल्ह्याच्या चुचुरामध्ये प्रसारमाध्यमांना संबोधित करताना घोष यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी २०३६पर्यंत सेवा करत राहतील. त्यानंतर त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी त्यांची जागा घेतील.
‘आम्ही ममतादीदींच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवू. मात्र अभिषेक बॅनर्जी आमचे सेनापती असतील. दीदी २०३६पर्यंत मुख्यमंत्री असतील आणि त्यानंतर सूत्रे अभिषेकवर सोपवली जातील,’ असे घोष यांनी सांगितले. तसेच, पक्षासंदर्भात सुरू असलेल्या अन्य अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
हे ही वाचा:
सोन्या- चांदीने, अनमोल रत्नांनी सजल्या रामलल्लाच्या पादुका!
कथुआतील निरपराध हिंदूंवरील अत्याचाराचा पुस्तकातून पर्दाफाश
स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक
लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!
तृणमूल काँग्रेस पक्षात सध्या दिग्गज नेते (ममता बॅनर्जी यांचे विश्वासू) आणि तरुण (अभिषेक बॅनर्जी यांचे निकवर्तीय) यांच्यात कथित संघर्ष असल्याचे वृत्त आहे. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तृणमूलचे खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी वयाच्या बाबत मत मांडले होते. ‘राजकारण असो की अन्य क्षेत्र. कमाल वयाची मर्यादा निश्चित झाली पाहिजे. ३५ किंवा ५० वर्षांची व्यक्ती ८० वयाच्या व्यक्तीइतके काम करू शकणार नाही,’ असे अभिषेक म्हणाले होते. तर, ममता बॅनर्जी यांनी ‘ अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तीही खूप महत्त्वाच्या आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी तरुण पिढीला ज्येष्ठांचा आदर राखण्याचे आवाहनही केले होते. तसेच, ज्येष्ठ राजकारण्यांनाही तरुणांचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते.