बंगालच्या उर्वरित टप्प्यांचे मतदान एकत्र घ्या

बंगालच्या उर्वरित टप्प्यांचे मतदान एकत्र घ्या

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या उरलेल्या चार टप्य्यांचे मतदान एकत्र घेण्यात यावे अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही मागणी करताना ममता बॅनर्जींकडून कोविड महामारीचे कारण पुढे करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

देशात एकीकडे कोविड महामारीची दुसरी लाट आलेली असताना, दुसरीककडे मात्र निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी अशा पाच विधानसभांची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्ष रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने कोविडच्या संपूर्ण परिस्थितीचे भान ठेवूनच योग्य ती खबरदारी घेत या निवडणूक घेण्याचे ठरवले. पण त्यानंतर देशातील कोविड रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावले जात आहेत. बुधवारी देशाने दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण नोंदवले. त्यामुळे आता या परिस्थितीत पश्चिम बंगालच्या उर्वरित टप्प्यांचे मतदान एकत्र घेण्यात यावे अशी मागणी तृणमूल काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली, काय आहेत नव्या तारखा?

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

ममता बानर्जींनी काय म्हटले आहे?
ममता बॅनर्जी यांनी गुरुवार, १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास ट्विट करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. “सध्या सुरु असलेल्या कोविड महामारीत पश्चिम बंगालच्या निवडणूक आठ टप्प्यांत घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो. सध्या कोविडच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करतो की त्यांनी उरलेल्या टप्प्यांचे मतदान एकत्र घ्यावे. यामुळे पश्चिम बंगालचे नागरिक कोविडच्या प्रादूर्भावापासून बचावतील.” असे ममता दीदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करतानाच पश्चिम बंगालच्या निवडणूकीसाठी आठ टप्प्यात मतदान पार पडेल असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. या पैकी २७ मार्च आणि १,६,१० एप्रिलचे मतदान पार पडले आहे. तर १७,२२,२६ आणि २९ एप्रिल असे चार टप्प्यांचे मतदान होणे बाकी आहे.

Exit mobile version