आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीत आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारे आघाडी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांसाठी २०२४ची लढाई सोपी राहिलेली नाही.
प. बंगालमधील काँग्रेस पक्षाचा एक गट पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत माकपसोबत आपली आघाडी तोडण्यासाठी तयार नाही. त्यामुळे कदाचित लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये माकप आणि काँग्रेस तृणमूल काँग्रेससोबत कोणतीही आघाडी करणार नाही, अशी शक्यता आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष आपली आघाडी कायम ठेवू शकतात. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी या ‘इंडिया’आघाडीत कायम राहण्याची शक्यता कमी आहे.
येचुरी यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष विरोधी पक्षांसोबत ‘इंडिया’ आघाडीच्या नावाखाली राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या विरोधातील लढाई लढणे सुरूच ठेवेल. मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत आघाडीचा प्रश्नच येत नाही.
‘भाजपला तृणमूल हा पर्याय नाही’
हे ही वाचा:
आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!
एल्विश यादव अटकेत नाही किंवा फरारीही नाही
नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीतून करणार वसुली
‘मी तुमच्यापैकी अनेकांना ओळखतो. मला तुमच्यापैकी अनेकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करणारी पत्रे मिळाली आहेत. ज्यामध्ये तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत डावे कसे उभे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचेही असेच मत आहे. तृणमूल हा भाजपला पर्याय नाही आणि असूही शकत नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तृणमूल एनडीए आणि भाजपसोबत आघाडी करतो. त्यांनी याआधीही असे केले आहे आणि यापुढेही असे करू शकतात,’ असे येचुरी म्हणाले. मात्र मग तुम्ही आघाडीत का आहात, असा प्रश्न त्यांना विचारला असता, ‘आम्हाला भाजपला सत्तेतून बेदखल करायचे आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले.