नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची ९ वी बैठक शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली होती. मात्र त्यांनी बैठक अर्धवट सोडून आपल्याला बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोप केला. आपला माईकही बंद करण्यात आला असा आरोप ममता यांनी केला आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत त्यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
ममता बॅनर्जीच्या आरोपांवर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. आम्ही सर्वांनी ते ऐकले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना प्रत्येक टेबलवर बसवलेल्या स्क्रीनवर दिसणारा वेळ देण्यात आला होता. त्यांचा माईक बंद झाल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. हे पूर्ण खोटे आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी योग्य वेळ देण्यात आला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा माईक बंद असल्याचा दावा केला होता, ते खरे नाही. त्यांनी खोट्या गोष्टींवर आधारित कथा तयार करण्याऐवजी खरे बोलावे,” अशी टीका निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी या नीती आयोगाची आयोगाची बैठक अर्धवट सोडून निघून गेल्या. यानंतर त्या म्हणाल्या की, “मी सभेवर बहिष्कार टाकला आहे. चंद्राबाबू नायडू यांना बोलण्यासाठी २० मिनिटे देण्यात आली होती. आसाम, गोवा, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी १० ते १२ मिनिटे घेतली. पण मला अवघ्या पाच मिनिटांनी बोलण्यापासून थांबवण्यात आलं. हे चुकीचे आहे,” असं त्या म्हणाल्या.
हे ही वाचा..
संतांवर जातीय टीका करणाऱ्या मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा
चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं?
केंद्र सरकार चालवताना सर्व राज्यांचा विचार करायला हवा. केंद्रीय निधीबद्दल बोलले जात असताना मुद्दा मांडला की, पश्चिम बंगालला निधी दिला जात नाही, तेव्हाचं त्यांनी माईक बंद केला. हा केवळ बंगालचा अपमान नसून सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे, अशी टीका ममता यांनी केली.