तुटलेल्या पायांनी ममता बॅनर्जीं खेळल्या फुटबॉल

तुटलेल्या पायांनी ममता बॅनर्जीं खेळल्या फुटबॉल

बुधवारी ३१ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या फ़ुटबॉल खेळताना आढळून आल्या. हावडा येथील प्रचार सभेदरम्यान ममता बॅनर्जी या व्हीलचेअरवर बसून तुटलेल्या पायांनी फुटबॉल खेळल्या. ममतांचा हा आवतार काही नवीन नसून या आधीही ममता बॅनर्जी फुटबॉल घेऊन प्रचार करताना दिसल्या होत्या.

देशात सध्या निवडणुकांचा माहोल असून पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या सरकार उलथून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने आपला गड राखण्याचा चंग बांधला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून या वेळी ‘खेला हॉबे’ असा प्रचाराचा नारा देण्यात आला आहे. याच ‘खेला हॉबे’ म्हणजेच ‘खेळ सुरु झालाय’ या घोषणेभोवती प्रचार केला जात आहे. त्यात बंगाली माणसाचे फुटबॉल प्रेम हे जगविख्यात आहे. त्यामुळे या ‘खेला हॉबे’ ला फुटबॉलची जोड देत एकप्रकारे बंगाली अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे ही वाचा:

इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश

‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे

अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

फडणवीसांनी केली आव्हाडांची बोलती बंद

बुधवारी प्रचार करतानासुद्धा अशाचप्रकारे फुटबॉलचा आधार ममता बॅनर्जी यांनी घेतला. १ एप्रिलच्या गुरुवारी पश्चिम बंगाल निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या टप्प्यात स्वतः ममता बॅनर्जी लढवत असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याच्या आदल्याच दिवशी ममता बॅनर्जी यांच्याकडून फुटबॉल खेळून मतदारांना आकर्षित करायचा प्रयत्न केला गेला. व्यासपीठावर असलेल्या ममतांनी व्हीलचेअरवर बसून फुटबॉल झेलत नंतर तो खाली उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांकडे भिरकावला. या आधी २७ मार्च रोजी देखील नारायणगड येथील प्रचारसभेत ममता फुटबॉल खेळताना दिसल्या होत्या.

Exit mobile version