भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे

भारतीय क्रिकेट संघाने सरावासाठी टीशर्ट वापरले

भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसह प्रशिक्षकांचे सराव सामन्याचे टीशर्ट भगव्या रंगाचे करण्यात आल्याबद्दल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेट खेळाचे केंद्र सरकारकडून भगवेकरण सुरू आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. मुळात हे टी शर्ट भगवे आहेत की नारंगी यावरूनही चर्चा सुरू आहे.

‘आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंबद्दल गर्व आहे आणि आपणच हा विश्वचषक जिंकू, यावर आमचा विश्वासही आहे. मात्र भाजपने येथेही भगवा रंग घुसवला आहे. आपले भारतीय खेळाडू या भगव्या रंगाच्या टी-शर्टमध्ये सराव करत आहेत. मेट्रो स्थानकांना भगवा रंग दिला जात आहे. हे अजिबात स्वीकारार्ह नाही,’ असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. त्यांनी यावेळी उत्तर प्रदेशात स्वतःच्या मूर्ती उभारणाऱ्या मायावती यांच्यावरही सडकून टीका केली.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

जरांगेच्या मागे कोण?

मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या

मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट

मध्य कोलकाताच्या पोस्ता बाजार येथे पूजेसाठी आलेल्या बॅनर्जी यांनी हा आरोप केला. ‘राष्ट्र हे देशाच्या जनतेचे आहे. केवळ एका पक्षाची त्यावर मक्तेदारी नाही,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. बॅनर्जी यांच्या टीकेचा भाजपनेते राहुल सिन्हा यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘काही दिवसांनी त्यांना तिरंग्यातील भगवाही अडचणीचा वाटू शकेल. त्या म्हणतील राष्ट्रध्वजात भगवा रंग का आहे? आम्ही अशा प्रकारचे वक्तव्य प्रतिक्रिया देण्यायोग्यही समजत नाही,’ असे सिन्हा म्हणाले.

Exit mobile version