ममता बॅनर्जी पडता पडता वाचल्या

ममता बॅनर्जी पडता पडता वाचल्या

ममता बॅनर्जी या कोलकाता येथे देशात वाढलेल्या इंधनांच्या किंमती विरोधात आंदोलन करत होत्या. यावेळी त्या स्कुटरवरून पडता पडता वाचल्या.

हे ही वाचा:

नीरव मोदी प्रकरण; बोलभांड निवृत्त न्यायाधीश काटजूना ब्रिटिश कोर्टाने झापले

देशात महागलेल्या इंधन दरांवरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न होता. यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक स्कुटर चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र थोड्याच वेळात हा प्रयत्न चांगलाच अंगलट आला. त्यांना स्कुटर नीट चालवता न आल्याने त्या पडता पडता वाचल्या मात्र तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी लगेच धाव घेऊन त्यांना वाचवले. त्यांची स्कुटर नाही, तरी या प्रसंगाचा व्हिडियो मात्र खुप चालला.

येत्या काही काळातच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कसून तयारी करायला लागले आहेत. या निवडणुकाच डोळ्यासमोर ठेऊन ममता बॅनर्जी सुद्धा काही हटके करायला गेल्या. प्रत्यक्षात काही हटकेच, मात्र अनपेक्षित असे घडले. ममता बॅनर्जी यांचे असे काही व्हिडियो यापूर्वी देखील प्रसिद्ध झाले आहेत. सीएए वरून चाललेल्या भाषणाचा ‘कॅकॅ छी छी’ त्यानंतर ‘हम्मा हम्मा डम्बा डम्बा’ असे शब्द बोलतानाचा व्हिडियो देखील चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

Exit mobile version