ममता बॅनर्जी पराभूत

ममता बॅनर्जी पराभूत

खेला होबे म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. नंदीग्राम या मतरदारसंघातून बॅनर्जी पराभूत झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांचे पूर्व सहकारी आणि निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे.

२ मे रोजी देशभरातील विविध निवडणुकांचे निकाल लागत आहेत. पण यात साऱ्या देशाचे लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममाता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपली पुरी ताकद लावली होती. पण तृणमूल पक्ष विजयाकडे जाताना दिसत आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरीही पश्चिम बंगालच्या या निवडणुकीत स्वतः तृणमूलच्या सेनापती ममता बॅनर्जी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा:

पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

आवताडेंनी केले महाविकास आघाडीला उताणे

निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक

अदर पुनावालांना धमकावणारे शिवसेनेचे गुंड?

ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत आपला पारंपारिक भवानीपूर हा मतदारसंघ सोडून नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. नंदीग्राम हा अधिकारी कुटुंबाचा गड मानला जातो. तरीही ममता बॅनर्जी यांनी तिथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपली सारी ताकद पणाला लावून त्यांनी अधिकारी यांना पराभूत कारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी अटीतटीची लढत दिली. पण अधिकारी यांचा पराभव करण्यात मात्र त्यांना यश आले नाही. १७३६ मतांनी सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे.

ममता यांच्या पराभवामुळे आता पश्चिम बंगालच्या राजकारणात आणखीन ट्विस्ट येणार आहे. कारण तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेपर्यंत पोहोचल्यावर ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदाची शपथ तर घेऊ शकतात पण त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत त्यांना निवडून येणे बंधनकारक असणार आहे.

Exit mobile version