ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या स्वागतासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रगीत अर्धवट गात कार्यक्रमाची सांगता केली. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला असून त्यांच्यावर खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांचे मुंबईत बुधवारी एका कार्यक्रमात स्वागत करण्यात आले. त्यासाठी गीतकार जावेद अख्तर, महेश भट्ट वगैरे मंडळी गोळा झाली होती. त्या कार्यक्रमात छोटे भाषण केल्यावर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत अर्धवट गायले. ….पंजाब सिंधू गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग इथपर्यंत गाऊन त्यांनी जय भारत, जय मराठा, जय बंगाल अशी घोषणा देत कार्यक्रम संपविला.

त्यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, दीदी अर्धवट राष्ट्रगीत म्हणणे हा अर्धवटपणा आणि राष्ट्रगीताचा अपमान आहे. हा अपमान केल्याबद्दल मी तुमच्यावर खटला दाखल करणार आहे, हे नक्की!

राष्ट्रगीत गाताना ममता बॅनर्जी यांनी त्यात राजकारण घुसडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. बंगाल आणि महाराष्ट्र यांचा उल्लेख करून त्यांनी राष्ट्रगीत थांबविले.

 

हे ही वाचा:

किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद

परदेशातून येणाऱ्यांना आता सात दिवस क्वारंटाइन

शाळाबंदी करून शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव

‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’

 

ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यात यांनी देशात नवा पर्याय देण्याच्या निमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदि नेत्यांच्या भेटींचा सपाटा लावला. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांची भेट झाली नसली तरी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली नंतर त्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या. यादरम्यान त्यांनी यूपीएचे अस्तित्व संपल्याची भाषा केली.

Exit mobile version